नको सांगूस गुपित तुझ्या मनातले
मी उमजून समजेन भाव मनातले
तुज हृदयासी स्पर्शू शकलो
हे काय मजला थोडे वाटे
भाव मनीचे चीतरू शकलो
हे काय मजला थोडे वाटे
तू समजुनी घेशील म्हणूनच
डोळ्यातुनी तुजशी बोललो
मज हृदयातील स्पन्दानाना
गीत म्हणुनी तुज ऐकविले
तुझी डोळ्यातील भाषा मज समजली
स्वीकृतीसाठी उघडझाप मी वाचिली
मानेचे तुझे झुकवणे होते लाजवाब
पहाडालाही झुकवेल ती सुबक कमान
मी पाहत राहिलो स्तंभित होवुनी
तू राहिली लिहित अंगुषटाने होकार
No comments:
Post a Comment