मनाच्या मेहफिलीत दोनच सितारे
एक श्रोता करीत धुंद एक गायके
मौजेची असे यांची मेहफिल
गायक इथे करतो वाह वाह
ऐकून श्रोत्याची बडबड
अजब नाते मनाचे इथे
कोण कोणास कसा विचारी
भाव प्रेमाचे जोडी त्यांना
दुसरे जग नसे विचारी
दुजा कोणासही नसे जाणीव
गुपित यांच्या धून्दीचे
यांच्या मनात असे विश्व
केवळ यांच्या स्वप्नांचे
No comments:
Post a Comment