Wednesday, January 4, 2012

Laman Diva


कोनाड्यातील लामण दिवा सांगे मज त्याची व्यथा
होवुनी राहिला शोभा कारणे न पुसशी कोण त्या

सनासुदीला घासून पुसून निघते तयाची वरात
बाकी समयी न पाही कोणीही ढुंकून तया

होते कधी सोबती त्याचे दिवटी अन मशाल
काळा आड दडले अस्तित्व तयाचे वीज येता घरात

वडीलधारे लहानस सांगसी कसे झाले़ तयाचे आगमन घरा
परी विसरसी मीच केली आहे त्यांची पिढ्यानपिढ्या सेवा

सुवासिनींनी कधी केली होती माझ्ीही आळवणी
सुखशांती घरी नांदुदे म्हणत केले आौक्शण

आत्ता जगणे धरित एक धागा  कोळीकश्टाचा
माझा उपयोग होतो त्यास आपले उदार भरण्यैचा

कधी येतील मज परतुनी दिवस गतवैभवाचे
माझीही होईल सेवा उजळण्यास घर आपुले

No comments:

Post a Comment