तु सांगे तुज बहु आवडे माझे बोलके डोळे
परी तू विसरशी तुझेच प्रतिबिंब तू तयात पाही
तु सांगे मज तुज न आवडे माझे अश्रू
परी तू विसरशी तूच आहेस त्यास कारणी
तू सांगे मज हास्य माझे तुज खूप लोभे
परी तू विसरशी तुझेच कवडसे मी पांघरी
तू सांगे मज माझे बोलणे तुज आवडे
परी तू विसरशी तुझेच नाव मज तोंडी असे
तू सांगे मज केसात माझ्या गुंतून तू रहाशी
परी तू विसरशी तुझ्याच डोळ्यांची सावली असे
तू सांगे मज मी तुज बहु आवडे
अरे वेड्या तुज अर्पिता हृदय काय माझे उरे
No comments:
Post a Comment