अहो इश्काची शल्लक न्यारी
मोर हि नाचे पिसारा फुलवुनी
लांडोरसी म्हणे तो भामटा
तुज साठीच रंगात सजविला तुरा
अहो इष्कात फुललाय मोगरा
भुंग्याला लावलाय त्याने गळात
अंतरी कुपी भरून मधात
मोगरा बोलविसी जवळ भुंग्यास
अहो इश्काची फिरली भिंगरी
पृथ्वी अडकली सूर्या भोवती
परत फिरून मागे ती दान
कर मजसी जवळ तूच माझा ईश्वर
अहो इश्काची भडकली आग
जवानीत उभे पेटले नर-नार
कोण आणू शके त्यांस भानावर
जवा मदनाने प्रचंती लाविला बाण
एकदम ठुम्केदार लावणी हाय राव.. तालावर नाचायला मज्जा येयील..
ReplyDelete