Sunday, June 14, 2020

तुझी छबी

तुझी छबी 

आरशात पुन्हा दिसली
तुझी छबी बिल्लोरी 
थोडी हसली जरा लाजली
मनात वसली छबी गोजिरी

हृदयात उठले तरंग 
अनुभवली सुखाची लहर 
विसरून सारे खिळून राहिली
तुझ्या छबीवर माझी नजर 

वाटले तू बोलशील काही
मनाचे भेद उघडशील आज 
माझी मनसा अपूर्ण राहीली 
मंद हास्यात वाजवीले साज 

एकदा वाटले मिटून डोळ्यांना   
कायमचे बंदिस्त करावे छबीला
पण क्षणात आले मनात 
कसे पूजणार बंदिस्त प्रेमाला 

ओळखून माझ्या मनातील घालमेल
तुझी छबी अंतधान पावली 
नेहमी प्रमाणे टिपले डोळे
स्वच्छ नजरेला छल कुठली 
   
गिरीश ११. ७. २०१५