Wednesday, January 4, 2012

kesu maze mulayam

प्रिये तू करिसी दंगा
माझ्या विरलेल्या केसांचा 
मीही पूर्वी मिरवत होतो तुरा
भाळी माझ्या रोमिओचा 
अग काय सांगू गाथा
माझ्या रेशमी केसांची 
तरुणीची हृदये थांबती 
बट येता मज कपाळी

सांभाळता तुझे लाड 
कुठले मज माझे ध्यान
तुझ्या कुरतडलेल्या केसानाही 
आता मी म्हणतो रेशमी बंध

आत्ता कळले का म्हणती सूद्न्य
केसाने केला शिरच्छेद
तुझ्यचं रक्षणा साठी मी 
केला पहा केस दान

No comments:

Post a Comment