विचारात तुझ्या मजला कशी रे रोखू
निशब्द आसवांना माझ्या कशी रे थोपवू
पुनवेचा चंद्र एक दिवस तरी असतो साथीला
अंधकारक जीवनी माझ्या कोणाची साथ मांगू
भटकलेल्या वाटसरूला तरी मिळे झाडाची छाया
माझ्या विराण जीवनात कुठला पाणवठा शोधू
वनात पशुही करतात भुकेसाठी श्रापदाचा वध
मानवातील पशु पासून कसे स्वतास सांभाळू
सारे समजवती मज, ईश्वरास होती तुझी गरज
तो भेटेल मज सहज, तुला कशी रे साद घालू
निशब्द आसवांना माझ्या कशी रे थोपवू
पुनवेचा चंद्र एक दिवस तरी असतो साथीला
अंधकारक जीवनी माझ्या कोणाची साथ मांगू
भटकलेल्या वाटसरूला तरी मिळे झाडाची छाया
माझ्या विराण जीवनात कुठला पाणवठा शोधू
वनात पशुही करतात भुकेसाठी श्रापदाचा वध
मानवातील पशु पासून कसे स्वतास सांभाळू
सारे समजवती मज, ईश्वरास होती तुझी गरज
तो भेटेल मज सहज, तुला कशी रे साद घालू
No comments:
Post a Comment