प्रेमळ शब्दांचा मारक झालास
क्षणात मज मिठीत विसावलास
गरजच काय दुसऱ्या कशाची
काळालाही दे आज्ञा थांबायची
आत्ता नको शब्दांचे लोण
श्वासाची होवूदे देवाण घेवाण
हृदयांना बोलूदे आपले बोल
स्पर्शाला येवूदे अमूल्य मोल
प्रेमाच्या डोहात दोघेही न्हावू
मधुर रसात एकजीव होवू
वेळेलाही नको आळवू आता
नाही जीवन या क्षणा पलीकडे
क्षणात मज मिठीत विसावलास
गरजच काय दुसऱ्या कशाची
काळालाही दे आज्ञा थांबायची
आत्ता नको शब्दांचे लोण
श्वासाची होवूदे देवाण घेवाण
हृदयांना बोलूदे आपले बोल
स्पर्शाला येवूदे अमूल्य मोल
प्रेमाच्या डोहात दोघेही न्हावू
मधुर रसात एकजीव होवू
वेळेलाही नको आळवू आता
नाही जीवन या क्षणा पलीकडे
No comments:
Post a Comment