Wednesday, January 4, 2012

Devsthan

तुज मनाच्या कोपऱ्यात मजला स्थान देशील का
मज मनाच्या साम्राज्यावर आपले नाव कोरशील का

मनाच्या फुलोऱ्यात रंगबेरंगी टपोरे गुलाब 
स्पर्शून त्यांना तुझा मोहक सुगंध देशील का

मनाच्या पाटावर सुबक रेखीव रांगोळी 
भरून रंग तयात तुझे रेखीव सौंदर्य देशील का 

मनाच्या नभावर चमचमत्या ताऱ्यांची दाटी 
सामावून तयात चंद्राची शीतलता आणशील का

मनाच्या कोठारीत विचारांची सदैव गर्दी 
समजुतीच्या चार बोलांनी विवेकाची मांडणी करशील का 

मनाच्या गाभाऱ्यात मांडली आहे पूजा 
अर्पून देवत्व तुझे पावित्र्य देशील का

No comments:

Post a Comment