Tuesday, January 31, 2012

avhreru

नको अव्हेरु प्रेम लाख मोलाचे
तुजसाठीच रुदयाच्या कोपर्यात जपलेले

आसवानी जेव्हा होते याचे िसंचन
कसे नाही फोफावणार रोपटे प्रेमाचे

श्रद्धा सबुरीच्या आहुत्या जीथे अर्पण
तो प्रेम यज्ञ आशिवादे स्व़यं परमेश्वर 

मान तु माझे सांगणे मी ंशोधला इश्वर
प्रेमच त्याचे प्रतिक दुजे सारे मिथ्य

Saturday, January 21, 2012

ओम साईनाथाय नम:



भक्तीची चेतना सदैव राहो आम्हा अंतरी

कृपेची सावली सदैव राहो आम्हा संसारी

भक्तीचा मळा जेंव्हा फुलेल आम्हा अंगणी
मोह पाश सगळे राहतील दूर वेशी पाशी

तू कृपावंत दयावंत दे आम्हास आसरा
तुज विन कोण सम्भाले या संसार भवरा

नको अव्हेरू कधी आम्हा पामरा
तुज पायी नमून मागतो आसरा

चिंतेची भाकर कधी नको सुवर्ण पात्री
सुखाचे वाडगे भरून वाढ आम्हा झोळी

तुज प्रेमाचा काला करू दे आम्हा भक्तास
तुझेच नाम सदा राहूदे आम्हा मुखी

entjar


लाख चाहू दिल को रोकना
पर किस्मत मेरी रोक न पावू
तेरी एक हंसी क्या खिले
खुदको दोनों जहा भूल जावू

तू चली आती हो जीवन में
एक सर्द हवा की तरह
पता है के तुजे रुकना नहीं यहाँ
दो पल जी लेता आघोष में यहाँ 

आसानिसे भूल तो नहीं सकता
प्यार का नाम जो दे रखा तुजे
और नसीब भी देखो तू हर मोड़  
लौट आती है याद दिलाने मुजे

अब छोड़ दिए मैंने 
अरमान किस्मत के हवाले
दो रास्तो की तरह मिलना है
तो इंतजार मोड़ का है मुजे

Wednesday, January 11, 2012

galavarchi khali

तझ्या गोबऱ्या गाला वरच्या 
खलिनी जाणली माझी व्यथा
तुझ्या मोहक हास्यात त्यांनी
जपली माझी गहरी व्यथा

आरश्यात पहा कसे मोहक 
दिसे तुझे निर्मल हास्य
माझ्या आठवणीची विवशता
शोभवी गालाच्या तुझ्या खळीत  

विरहात कितीही विवश असलो
तरी मी शोभवीन तुझे हास्य
खरे प्रेम शिकवे कराया 
त्यागातुनी मिळे खरे सुख        

Lavani

अहो इश्काची शल्लक न्यारी 
मोर हि नाचे पिसारा फुलवुनी
लांडोरसी म्हणे तो भामटा 
तुज साठीच रंगात सजविला तुरा 

अहो इष्कात फुललाय मोगरा
भुंग्याला लावलाय त्याने गळात 
अंतरी कुपी भरून मधात 
मोगरा बोलविसी जवळ भुंग्यास  

अहो इश्काची फिरली भिंगरी 
पृथ्वी अडकली सूर्या भोवती 
परत फिरून मागे ती दान
कर मजसी जवळ तूच माझा ईश्वर 

अहो इश्काची भडकली आग 
जवानीत उभे पेटले नर-नार 
कोण आणू शके त्यांस भानावर 
जवा मदनाने प्रचंती लाविला बाण 

Wednesday, January 4, 2012

kundkalya

कुंदकळ्यांची मेखला अजब 
गालावरची खळी लाजवाब 
रेखीव डोळ्यात चमके रत्न 
भव्य भाळी विद्दवतेची झलक
सरळ नासिका तलवारी पात  
काय सांगू पाहे तू हास्यातून 
सरस्वती वदली विणे झंकारून 

Laman Diva


कोनाड्यातील लामण दिवा सांगे मज त्याची व्यथा
होवुनी राहिला शोभा कारणे न पुसशी कोण त्या

सनासुदीला घासून पुसून निघते तयाची वरात
बाकी समयी न पाही कोणीही ढुंकून तया

होते कधी सोबती त्याचे दिवटी अन मशाल
काळा आड दडले अस्तित्व तयाचे वीज येता घरात

वडीलधारे लहानस सांगसी कसे झाले़ तयाचे आगमन घरा
परी विसरसी मीच केली आहे त्यांची पिढ्यानपिढ्या सेवा

सुवासिनींनी कधी केली होती माझ्ीही आळवणी
सुखशांती घरी नांदुदे म्हणत केले आौक्शण

आत्ता जगणे धरित एक धागा  कोळीकश्टाचा
माझा उपयोग होतो त्यास आपले उदार भरण्यैचा

कधी येतील मज परतुनी दिवस गतवैभवाचे
माझीही होईल सेवा उजळण्यास घर आपुले